27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeबीडकेजजवळ भीषण अपघातात ४ ठार

केजजवळ भीषण अपघातात ४ ठार

एकमत ऑनलाईन

बीड : केज-अंबाजोगाई महामार्गावर ईनोव्हा कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघात इतका भीषण होता की, आसपास असलेल्या लोकांना काय झाले हेच समजत नव्हते. या अपघातात अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

केज तालुक्यातील अंबाजोगाई-केज या राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ४ च्या सुमारास रिक्षा आणि ईनोव्हा कारची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे तुकडे-तुकडे झाले असून ईनोव्हा कार रिक्षाला धडकून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (३६, रा. केज), बालाजी संपत्ती मुंडे (२८, रा. पिसेगाव) आणि दोन बालकांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर काही खाजगी वाहने आणि अ‍ॅम्बुलन्स बोलावून अपघातग्रस्तांना अंबाजोगाई येथील स्वरात रुग्णालयात हलवले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
नाशिक जिल्ह्यात ट्रॅक्टर,

कारचा अपघात, ६ ठार
नाशिक जिल्ह्यातील वणी-मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी ट्रॅक्टर आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या अपघातात एक चिमुकलीही गंभीर जखमी झाली आहे. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या