21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeबीडघरावर राष्ट्रध्वज लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

घरावर राष्ट्रध्वज लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

बीड : उद्या १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७५ वा स्वातंर्त्यदिन आहे. यानिमित्तानं देशभरात केंद्र सरकारच्या वतीनं स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबावण्यात येत आहे. स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

या निमित्तानं सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलंय. मात्र, बीडमध्ये एक दुर्देवी घटना घडलीय. केज तालुक्यातील वरपगाव इथं राष्ट्रीय ध्वज लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

शेख मुख्तार (वय ३०) असे मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या कुटुंबीयांसह वरपगाव इथं राहतो. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान देशभरात राबविण्यात येत असून यास प्रतिसाद देत मुख्तार यानं सकाळीच घरावर राष्ट्रध्वज लावला होता. परंतु, पाईप हवेने झुकल्याने तो व्यवस्थित करायला गेला होता.

मात्र, स्टीलचा पाईप विद्युत तारेला लागल्याने विजेचा धक्का लागून शेख मुख्तार फेकला गेला. तातडीनं त्याला केज येथील दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनं वरपगाव इथं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या