25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeबीडएजंट अंगणवाडी सेविकेकडे सापडले २९ लाख

एजंट अंगणवाडी सेविकेकडे सापडले २९ लाख

एकमत ऑनलाईन

बीड : अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि एजंट असलेल्या अंगणवाडी सेविकेकडे ५०० रु., २ हजार रुपयांची नोटांची बंडल सापडली आहेत. ही रक्कम जवळपास २९ लाख रुपये आहे. तसेच जमीन, कोट्यवधींचे बंगलेही तिच्या नावावर आहेत. एजंटांकडे एवढे पैसे म्हटल्यावर मुख्य सूत्रधाराकडे किती असतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणात पाच जणांविरोधात रात्री उशिरा पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) या महिलेचा ५ जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या; परंतु रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनीषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला, नर्स यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांनी एजंट मनीषाच्या घराची मंगळवारी रात्री झडती घेतली. यात रोख २९ लाख रुपये सापडले आहेत. तसेच खोके, कॉट, पर्स, डबे, कपाट आदी ठिकाणी ५०० ते २ हजार रुपयांच्या नोटांचे बंडल निघत होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास आणखी सुरूच असून आरोपींची साखळी वाढण्याची शक्यता आहे.

या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, अंगणवाडी सेविका मनीषा सानप, नर्स सीमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांनी यात फिर्याद दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या