36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeबीडअंबाजोगाई येथील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, मुलगी सुखरूप

अंबाजोगाई येथील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, मुलगी सुखरूप

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमेरिकेत राहत असलेल्या अंबाजोगाईमधल्या तरुण दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही आत्महत्या आहे की खून या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार यांना चार वर्षांची मुलगी देखील आहे. मुलगी सुखरुप असल्याची माहिती आहे. बालाजी हे अंबाजोगाईमधील व्यापारी भारत रुद्रावार यांचे चिरंजीव होते. सहा वर्षांपूर्वी ते अमेरिकेमधील न्यू जर्सी राज्यात स्थायिक झाले होते.

बुधवारी बालाजी आणि आरती यांची कन्या घराच्या गॅलरीत बराच वेळ रडत असल्याने संश आल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. दरम्यान, ही आत्महत्या की हत्या याचा तपासा पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेतील पोलिसांनी रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूची माहिती भारतातील त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. ही बातमी ऐकताच रुद्रवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे.

नगर-औरंगाबाद रोडवर बर्निंग अ‍ॅम्ब्युलन्स

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या