34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeबीडउपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

एकमत ऑनलाईन

बीड : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गोकुळाष्टमीला अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला.

सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही जण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  भगरीचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. वारंवार या भागात अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

९५ वर्षांच्या आजीबाईने केली कोरोनावर मात

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या