24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeबीडभाजपा नेत्यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध

भाजपा नेत्यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध

एकमत ऑनलाईन

बीड : काल राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती उदयनराजेंना समज दिली. याचा जाहीर निषेध करत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून जाहीर निषेध केला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक , कुंडलिक बापु खांडे, बाळासाहेब आंबूरे, किसान सेना प्रमुख परमेश्वर सातपुते सर, महिला संघटिका चंद्रकला ताई बांगर, संगीता चव्हाण, गोरख सिंघन, सुशील पिंगळे, रविंद्र कदम, योगेश नवले, मशरु पठान,रतन गुजर,कल्याण कवचट, राजेंद्र अण्णा राऊत, भीमराव वाघचौरे, दिलीप भोसले, रामसिंग अण्णा टाक, गणपत डोहिफोडे,अरुण बोंगाने,पांडुरंग गवते,राहुल घोडके,विकास गवते, अशोक शिंदे, सुदर्शन मोरे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Read More  हायकोर्टाचा सकाल : 65 वर्षांवरील कलाकारांना सेटवर काम करण्यास बंदी का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या