केज : केज -अंबाजोगाई महिमार्ग क्र ५४८(डी) या रस्त्यावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान झालेल्या रिक्षा व इनोव्हा कारच्या अपघातातील मयतांचा आकडा वाढला असून आणखी चौघांचा मृत्यू झाला असून मयतांची संख्या आठ झाली आहे.
केज अंबाजोगाई महामसर्ग क्र ५४८-डी या महामार्गावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान दि २ जून रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान झालेल्या रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) आणि इनोव्हा कार क्र (एम एच-१६/सी एन-७००)च्या भीषण अपघातात मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके (४८ वर्ष), प्रिया दीपकसिंग गोके (२ वर्ष), वीरसिंग दीपकसिंग गोके (१ वर्ष) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (३५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
तर इतर आठ जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार सुरू असताना जखमी पैकी हरजितसिंग बादलसिंग टाक, दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके,चंदाबाई बादलसिंग टाक, भारती कौर दिपकसिंग गोके या चौघांचा आज मृत्यू झाल्याची माहीती युसूफ वडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांनी दिली आहे.