27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeबीडपूर परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा

पूर परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा

एकमत ऑनलाईन

बीड : २६ जुलै रोजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यभरात पूर परिस्थिती आहे. नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतक-यांच्या शेतात घुसले, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत.

बळिराजाला मोठा फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

माझ्या वाढदिवशी आपण सामाजिक कार्य करा, पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या शेतकरी बांधवांना मदत करा. वाढदिवसानिमित्त मला भेटायला न येता सामाजिक कार्य करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या