25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeबीडबीड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

बीड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

एकमत ऑनलाईन

  • उडीद, मूग, कांदा पिकांचे मोठे नुकसान, शेतक-यांची मदतीची मागणी
    बीड : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तसेच शेतात पाणी शिरल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पिकांचे मोठे नुकसान
सध्या बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव, आनंदवाडी या दोन गावांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. तसेच तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतक-यांनी केली आहे. आमच्या सराटे वडगाव, आनंदवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. या ढगफुटीमुळे शेतीतील उडीद, मूग, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिकं वाया गेली आहेत.

तसेच अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, राज्यात अद्यापही तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या