19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeबीडजलयुक्तमधील भ्रष्टाचार, कृषि सहसंचालकांसह ६ जणांवर गुन्हा

जलयुक्तमधील भ्रष्टाचार, कृषि सहसंचालकांसह ६ जणांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

बीड : राज्यात खळबळ उडवून दिलेल्या परळीतील जलयुक्त शिवार योजनेतील तथाकथित भ्रष्टाचार प्रकरणी सेवानिवृत्त विभागीय कृषि सहसंचालकाला चांगलेच भोवले आहे. अखेर सेवानिवृत्त विभागीय कृषि सहसंचालकासह ६ जणांवर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परळीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काँग्रेसच्या वसंत मुंडे यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला.

बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून २० लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्या प्रकरणात दोषी सेवानिवृत्त विभागीय कृषि सहसंचालक रमेश भतानेसह ६ अधिका-यांवर परळीचे तालुका कृषि अधिकारी अशोक अंबादासराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपींनी केलेला भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असा आदेश उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिला होता. त्यानुसार परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषि खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये १३८ मजूर संस्था तसेच २९ गुत्तेदार व सुशिक्षित बेकार अभियंता २८ अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र मुख्य आरोपी सेवानिवत्त विभागीय कृषि सहसंचालक रमेश भताने यांच्यासह इतर ५ अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

त्या काळात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात नियमबा बोगस कामे दाखवून बिले उचलली. त्यावेळी शासनाच्या कोणत्याच निकषांचे पालन केले नाही. परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत योजनेमधील दोन्ही टप्प्यांत चौकशी अंतर्गत ८ कोटी ३६ लाखांचा भ्रष्टाचार झाला, हे कृषि खात्याच्या दक्षता पथकामार्फत सिद्ध झालेले आहे. त्यामध्ये ५० टक्के गुत्तेदार व ५० टक्के अधिका-यांकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे.

या अधिका-यांवर गुन्हा
सेवानिवृत्त विभागीय कृषि सहसंचालक रमेश भताने यांच्यासह भीमराव बांगर, शंकर गव्हाणे, दीपक पवार, सुनील रामराव जायभाये व सौ. कमल लिंबकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

१८ लाखांचा भ्रष्टाचार
जलयुक्त शिवार योजनेत २०१५ ते २०१७ दरम्यान १८ लाख ३२ हजार ३३६ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कलम ४२०, ४०८, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय परीक्षा १० जूनपासून; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या