अंबाजोगाई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकारणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनीदेखील चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिका-यांना दिले होते. केतकी चितळे हिने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुक आणि ट्वीटरवर बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट केली होती. त्यावरून राज्यात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे.