36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeबीडबीड जिल्हा बँकेत धनंजय मुंडेंचे वर्चस्व

बीड जिल्हा बँकेत धनंजय मुंडेंचे वर्चस्व

एकमत ऑनलाईन

बीड : मुंडे बहीण-भावाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे बहुचर्चित बीड जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडलीे. निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकल्यानंतरच चित्र स्पष्ट झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल विजयी झाल्याचे समोर आले आहे. यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ८ पैकी ५ जागांवर विजय मिळाला. हा पंकजा मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे.

बीड जिल्हा बँकेच्या ८ जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते. ५८ टक्के मतदान झाले तर मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळ झाला होता. बोगस मतदान झाल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच या कारणावरून परळीत भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत भांडणदेखील झाली होती. या पार्श्वभूमीवर आज मतमोजणीला सकाळी ९ वाजल्यापासून बीड जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सुरुवात झाली. यात ८ पैकी ६ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली.

यामध्ये इतर शेती संस्था मतदार संघात अमोल आंधळे यांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात धनराज राजभाऊ मुंडेंना फक्त ८ मते मिळाली.कृषि प्रक्रिया मतदार संघात भाऊसाहेब नाटकर ४१ मतांनी विजयी, पतसंस्था मतदार संघात राजकिशोर पापा मोदी ९३ मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधातील गंगाधर आगे यांना ३६ मते मिळाली.जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदार संघातून कल्याण आखाडे ७१६ मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात रवींद्र दळवी ७२० मते मिळवून विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघात सुशीला शिवाजी पवार विजयी झाल्या. तसेच कल्पना दिलीप शेळके विजयी झाल्या. विमुक्त जाती-जमाती मतदार संघात सूर्यभान मुंडे विजयी झाले.

८ पैकी ५ जागांवर मुंडे पॅनलचा विजय
-शेतकरी विकास पॅनल-०५
-सुरेश धस गट भाजप -०१
-शिवसेना क्षीरसागर गट -०१
-अपक्ष -०१

कोरोना नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या