माजलगाव : प्रसुतीदरम्यान डॉक्टरने हलगर्जीपणा केल्यामुळे एका महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगावच्या जाजू रुग्णालयात घडली. या प्रकरणी जबाबदार असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. बीडच्या माजलगाव येथील जाजू रुग्णालयात सोनाली गायकवाड या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीदरम्यान तिची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या मृत्यूला जाजू हॉस्पिटलचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर जाजू दाम्पत्याला अटक केली.