34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeबीडअंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभर अधिक नवे रुग्ण दाखल होत आहेत. उपचाराची तेवढी सुविधा नसल्याने मृत्यूचा दरही झपाट्याने वाढत आहे. अशातच स्वाराती रुग्णालयातील सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रस्त्यावरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अंत्यंसंस्कार केले.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात.त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात ४ दिवसामध्ये पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तरीदेखील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृंचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या ८ रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर अग्निसंस्कार झाले. मृतात १ महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षांपुढील आहेत.

 

लातुरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या