24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeबीडफडणवीस-पंकजा मुंडेंची दिलजमाई?

फडणवीस-पंकजा मुंडेंची दिलजमाई?

एकमत ऑनलाईन

बीड : सत्तांतरानंतर झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्या नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज आष्टी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच चॉपरमधून दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद नाकारल्याने नाराज असलेल्या पंकजांची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास करण्याचा योग जुळून आल्याने हे पक्षाच्या दृष्टीने चांगली सुरूवात असल्याचे अनेकांचे मत आहे. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच चॉपरमधून आष्टी येथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पद न दिल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली आहे का? असा प्रश्न या एकत्र प्रवासामुळे उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कार्यक्रमात बोलताना या कामाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाले आहे. मात्र, या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या