27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeबीडबीडमध्ये भर रस्त्यात युवकांमध्ये गँगवॉर

बीडमध्ये भर रस्त्यात युवकांमध्ये गँगवॉर

एकमत ऑनलाईन

बीड : बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात युवकांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हीडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हीडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या वादामध्ये धारदार शस्त्राने एका तरुणावर इतर आठ तरुणांनी हल्ला केला. कुणाल ढोले असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील या गँगवॉरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे की नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या