22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeबीडप्रामाणिकपणा : नव्वद हजाराचे सोने महिलेने केले परत

प्रामाणिकपणा : नव्वद हजाराचे सोने महिलेने केले परत

एकमत ऑनलाईन

बीड :  पंचमी निमित्त माहेरी आलेल्या हिवरगव्हान ता वडवणी येथील पूजा नाईकवाडे हिचे 1 तोळे व 7 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठन कापड दुकानात सापडल्यानंतर सोंनाथडी येथील अनिता सीताराम वगरे या महिलेने पोलिसांत आणून जमा केले. अनिता वगरे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

हिवरगव्हान (ता. वडवणी) येथील पूजा नाईकवाडे या आपल्या माहेरी आनंदगाव येथे पंचमी सणा निमित्त आल्या होत्या.सोमवारी साडी खरेदी करण्यासाठी त्या शहरातील रामेश्वरी वस्त्र भांडार येथे आल्या होत्या. त्यांचे पावणेदोन तोळ्यांचे गंठन असलेली पर्स पाणी पितांना पडली. ती पर्स आज सकाळी अनिता वगरे यांच्या मुलांनी पोलीस ठाण्यात आणून ए. पी. आय. राठोड यांच्या कडे जमा केली.

सदर दागिने हरवल्याची तक्रार काल पूजा नाईकवाडे यांनी शहर पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी बीड रोड वरील एक दोन कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ही ताब्यात घेतले. परंतु तत्पूर्वीच वगरे यांनी दागिने पोलिसात जमा करून आपल्या प्रामाणिक पणाचा परिचय दिला.

Read More  दहावीत एकाच वेळी माय लेकराचे यश संपादन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या