22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeबीडबीडचा बिंदुसरा प्रकल्प ९८ टक्कांवर

बीडचा बिंदुसरा प्रकल्प ९८ टक्कांवर

एकमत ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील बहुतांश मोठे, लघु व मध्यम तलाव तुडूंब भरले

बीड : या वर्षी चांगला पाऊस झाल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत मागच्या वषीर्पेक्षा यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने, जिल्ह्यातील बहुतांश मोठे, लघु व मध्यम तलाव तुडूंब भरले आहेत. यातच बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प देखील ९८ टक्के भरला आहे. बीड शहरात जवळील पाली परिसरात हा तलाव असून ९८ टक्के भरल्याने बीड शहरातील नदी पत्रातील आणि नदी पात्रा जवळील नागरिकांना बीड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष भरतभूषण क्षीरसागर यांनी तात्काळ स्थलांतरीत करण्याचा इशारा दिला आहे.

ओव्हर फ्लो होऊ शकते

बीड शहराच्या जवळ बिंदुसरा हे मोठे धरण आहे या वर्षी ते ९८ टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी एखादा मोठा पाऊस झाला तर ते ओव्हर फ्लो होऊ शकते. त्याचा परिणाम नदीकाठच्या गावांना होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या धरणाच्या जवळील आणि बिंदुसरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

माजलगाव धरण दि. १५ रोजी आजची पाणीपातळी नागपूरमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरूच : काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची भरदिवसा हत्या ४३०.४२ मी. एकूण साठा ३५३.२० दलघमी, उपयुक्त साठा २११.२० दलघमी, उपयुक्त साठा टक्केवारी ६७.६९% इतका झाला असून पाली येथील बिंदुसरा धरण ९८% भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या