18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeबीडमाजलगावात पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या

माजलगावात पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या

एकमत ऑनलाईन

माजलगाव : मंजरथ येथील काळे वस्ती येथे राहणा-या एका व्यक्तीने पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

मंजरथपासून जवळच असलेल्या काळे वस्तीवरील पांडुरंग दोडकले याने पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले व मुलगा पिल्या पांडुरंग दोडकले या दोघांची झोपेत असताना तीक्ष्ण हत्याराने मंगळवारी पहाटे तीन वाजता हत्या केल्याची घटना घडली.

दोघा मायलेकराची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले यांने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली. या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने हत्या का केली तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या