24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeबीडगोपीनाथ मुंडेंचे स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करतोय; धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करतोय; धनंजय मुंडे

एकमत ऑनलाईन

बीड : आज भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन. ३ जून २०१४ रोजी त्यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाला आज आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी राज्यातील सर्व राजकारण्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहत भावूक पोस्ट केली आहे.

दरम्यान ते गोपीनाथ गडावर आदरांजली वाहण्यासाठी आले असताना गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. त्यांचा आवाज आजही कानात घुमतो आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. ट्विट करत ते म्हणाले की, अजूनही आठवतो तो ३ जूनचा काळा दिवस… आजही असं वाटतं आप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर… अशी भावनिक पोस्ट करून त्यांनी आपले चुलते गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या