26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeबीडमंत्र्यांना फिरणे मुश्किल करू

मंत्र्यांना फिरणे मुश्किल करू

एकमत ऑनलाईन

ऊसतोड कामगार नेत्याचा इशारा
बीड : सरकार म्हणून तुम्ही ऊसतोड कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घ्या. ऊसतोड कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहेत. सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या फायद्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, ऊसतोड कामगार महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा येणा-या काळात सरकारमधील मंत्र्यांचे फिरणे मुश्किल करू, असा इशारा ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून जिल्ह्यात ऊसतोड कामगाराची नोंदणी सुरू करावी. ऊस तोडणी कामगारांना प्रत्यक्ष लाभ द्यावा. या प्रमुख मागण्या घेऊन आणि ऊसतोड कामगारांच्या दशा आणि सरकार विरोध आंदोलन करण्याच्या दिशा ठरवण्यासाठी बीडच्या माजलगावमध्ये महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोड कामगार विभागीय परिषदेचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या