28.7 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home बीड ‘मॉँ तुझे सलाम’ होतेय तुफान लोकप्रिय : कप सॉँग आहे तरी काय?

‘मॉँ तुझे सलाम’ होतेय तुफान लोकप्रिय : कप सॉँग आहे तरी काय?

एकमत ऑनलाईन

पुणे: पुणे येथे कार्यरत असलेले बीडचे कलावंत व प्रसिद्ध संगीतकार प्रा. जयराम जोशी यांच्या स्वराली व स्वरश्री या दोन्ही कन्याही संगीत क्षेत्रात आपली स्वत:ची ओळख निर्माण करीत आहेत. सर्वत्र लोकप्रिय होत असलेल्या कप साँग या प्रकारात स्वरालीनं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘माँ तुझे सलाम’ हे गीत स्वत: कप रिदम वाजवून गायलं आहे, त्याला सोशल मीडियावर असंख्य चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

सोशयमिडियाकडून मिळतोय मोठा प्रतिसाद
गोड गळ्याच्या स्वरश्रीने आपल्या मधुर आवाजात गायीलेली व जयराम जोशी यांनी लिहिलेली व संगीत बद्ध केलेली बंद शाळेचे मनोगत व ‘ऑनलाईन शिक्षणाचा आला कंटाळा’ ही गाणी पूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला शिक्षण क्षेत्रातून व रसिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षणातही अव्वलस्थान कायम
स्वरश्री ची मोठी बहीण स्वराली हिने गायन, हार्मोनियम वादनात विशेष योग्यता श्रेणीत विशारद पदवी प्राप्त केली असून तीचा सिंथेसायझर वादनात पाश्चात्य संगीत शास्त्राचाही अभ्यास चालू आहे, तसेच शालेय शिक्षणापासूनच महाविध्यालयीन शिक्षणातही सातत्याने मेरिट लिस्ट मधील आपलं स्थान कायम ठेवले आहे,

कप रिदम वाजवून गायलं ‘माँ तुझे सलाम’
स्वरालीनं तबला वादनाचेही शिक्षण घेतले असून नुकताच सर्वत्र लोकप्रिय होत असलेल्या कप साँग या प्रकारात स्वरालीनं ‘माँ तुझे सलाम’ हे गीत स्वत: कप रिदम वाजवून गायलं आहे, त्याला सोशल मीडियावर असंख्य चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे,स्वरालीनं केवळ तानपुरा साथीत गायलेलं श्रावणात घन निळा हे गाणंही सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान : 90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या