19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeबीडबीडमध्ये मोर्चा निघणारच

बीडमध्ये मोर्चा निघणारच

एकमत ऑनलाईन

बीड : मराठा आरक्षण संदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी घेतली असून या अनुषंगाने आज पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून निघणारच. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे, असे मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले.

बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकीसंदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी५ जूनला सकाळी १०:३० वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही, पण मोर्चा होणारच, असा निर्णय बैठकीत झाला. या वेळी या मोर्चाचे नाव मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा असे असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे, असे ते म्हणाले.
विविध समित्यांद्वारे

जिल्ह्यात प्रचार दौरा
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर-तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी ९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

यावेळी संघर्षशील मोर्चा
यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे म्हणाले. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत निकराचा लढा सुरूच राहील, असेदेखील विनायक मेटे म्हणाले.

औरंगाबादमध्ये बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या