20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeबीडआता आमच्यात नातच उरलेले नाही

आता आमच्यात नातच उरलेले नाही

एकमत ऑनलाईन

परळी : राज्यातील बीडच्या बहिण भावांच्या नात्याचे राजकारण देशाला माहित आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद राज्याला माहित आहे. कोणत्याना कोणत्या विषयावर दोघांमध्ये जुंपलेली पाहिला मिळत असते.

आता मात्र पंकजा मुंडे आणि बंधू धनंजय मुंडे यांच्यात भाऊ बहिनीचे नाते राहिले नसल्याचे धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. मुंडे म्हणाले आता आमच्यात बहीण-भावाचे नात उरलेले नाही. राजकारणामुळे आता आम्ही एकमेकांचे वैरी आहोत. आम्ही पूर्वी ख-या अर्थाने एकमेकांचे नातेवाईक होतो. पण राजकारणामुळे आमच्यात वैर निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही आता दुरावलो असून अशा वागण्यामुळे काय परिणाम होतो. याचे ज्याचे त्याने आत्मपरीक्षण करावे असे धनंजय मुंडे म्हणाले.

माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रु नाही : पंकजा मुंडे
धनंजय मुंडे यांच्या या व्यक्तव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनीच रक्ताचे नाते कधी संपत नाही असे सांगितले होते. मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असून मला कुणी वैरी वाटत नाही असे मुंडे म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या