23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeबीडआष्टी-नगर रेल्वेचे २३ ला लोकार्पण

आष्टी-नगर रेल्वेचे २३ ला लोकार्पण

एकमत ऑनलाईन

बीड : अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या आष्टी-नगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळ््याचा अखेर मुहूर्त ठरला. २३ सप्टेंबर रोजी आष्टी-नगर रेल्वेचा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा दिवस जवळ आला आहे. या सोहळ््यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत. आष्टी येथे हा रेल्वेच्या लोकार्पणचा सोहळा पार पडणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली नगर ते आष्टी या ६७ किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होणार आहे. याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे होत आहे. यापूर्वी अनेक वेळा या रेल्वेच्या उद्घाटनाचे मुहूर्त ठरले. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात येत होता. अखेर आता २३ सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. नगर-परळी रेल्वे मार्गाची २६१ किलोमीटर एवढी लांबी आहे. नगरपासून आष्टीपर्यंत ६७ किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले. मागील ६ महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. मात्र, लोकार्पण सोहळ््याचा मुहूर्तच ठरत नव्हता. या रेल्वेमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ३० वर्षांनंतर स्वप्न पूर्ण होत आहे.

६७ किमी मार्गावरील चाचणीही यशस्वी
नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी असा ६७ किलोमीटरच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यावर यशस्वी रेल्वेची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, नगर ते आष्टी रेल्वेच्या उद्घाटनास मंत्री आणि पदाधिका-यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या