21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeबीडअंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

अंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेंचे वर्चस्व कायम

एकमत ऑनलाईन

बीड : बीड जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी काल निवडणूका पार पडल्या. त्याचे आज निकाल जाहीर झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेचे वर्चस्व कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल स्थानी तर राष्ट्रवादी काँग्रेस दुस-या स्थानी पोहचले आहे. शिंदे गटाने देखील दोन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. शिवसेनेने गवळवाडी ग्रामपंचायतीसह तीन ठिकाणी यश मिळविले आहे.

पाच पैकी तीन ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत काँग्रेसला धूळ चारली आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने बाजी मारत तीन ग्रामपंचायतवर विजय मिळवला. यात मोरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत काँग्रेसला धक्का दिला आहे.

बीड जिल्हात भाजपा पक्ष ठरला अव्वल
भाजपने दगडवाडी, श्रीपतरायवाडी, चनई या तीन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला तर लोखंडी सावरगाव या ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष गट तट बाजूला ठेवून निवडणुका लढल्या जातात. यातच अभद्र युती सुद्धा पाहायला मिळते. मात्र, बीड जिल्हात पंकजा मुंडेंचा करिश्मा कायम दिला आहे. आता ग्रामपंचायतमधून काँग्रेसला हद्दपार करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या