24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeबीडशिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन

एकमत ऑनलाईन

बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आज अनंतात विलिन झाले. त्यांच्या पार्थिवाला आज अग्नी देण्यात आला आणि एका संघर्षाचा शेवट झाला. विनायक मेटे यांचे बीडमधील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. विनायक मेटे यांचं रविवारी एका अपघातात निधन झालं होते. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

विनायक मेटें अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आलं. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विनायक मेटे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या