बीड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यातही तशी गंभीरच स्थिती आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ७३८ वर पोहचलाय तर आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये घडलेला एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांची तडफड सुरू आहे तर नातेवाईकांची आॅक्सिजन लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार….
अनेक व्हिडिओ कोरोना संदर्भात समोर येत आहे. बहुतांश व्हिडिओमध्ये रुग्णालयाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे लक्षात येत आहे. केवळ मोबाईलमुळे तरी कोरोना विभागात काय प्रकार चालला आहे ते बाहेर समजू शकते नाहीतर परिस्थिती लोकांसमोर आलीच नसती. बीडच्या कोरोना कक्षात अचानक लाईट गेल्यामुळे मोठी तारांबळ उडाली आगे. व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे रुग्ण अक्षरश: तडफडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाचा आणि रुग्णालय विभागाचा भोंगळा कारभार समोर आला आहे.
व्हिडिओ पाहून अनेकांना रुग्णालयातील आपल्या नातेवाईकांविषयी चिंता वाढली असून असा कारभार असेल तर आमची माणसं परत येतील का असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. शासकिय यंत्रणांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ असून लाईट गेली हा प्रकार आरोग्य विभागासाठी गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी लाईट कशी गेली, किंवा त्या संदर्भात पर्यायी व्यवस्था का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. लाईट या विषयावर गांभीर्याने उपाय करण्याची आता गरज असून यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आॅक्सिजण लावण्यासाठी रग्णांच्या नातेवाईकांनीच केली धावपळ
हा व्हिडीओ दोन ्दिवसांपूर्वीचाच असल्याची माहिती मिळत आहे. रुग्ण तडफडत असताना अचानकपणे नेमक काय करावं हे डॉक्टरांना देखील लक्षात आलं नाही असे दिसते. रूग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करीत कक्षातीलच आॅक्सिजन लावण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे. सदर रुग्ण गेवराई तालुक्यातील असून अखेर त्या रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कोणत्या काणामुळे झाला आहे त्याचा खोलवर तपास करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
Read More इरफान खानचा मुलगा म्हणाला…मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन