36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeबीडबीडमधील जावयांचा जीव पडला भांड्यात; गर्दभ सवारीची प्रथा खंडित?

बीडमधील जावयांचा जीव पडला भांड्यात; गर्दभ सवारीची प्रथा खंडित?

एकमत ऑनलाईन

बीड : कोरोनाने सगळ्यांनाच जेरीस आणले आहे, परंतु जावई मंडळींसाठी तो पर्वणी ठरू लागला आहे. हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल मात्र बीडमधील जावयांचा जीव खरंच भांड्यात पडला आहे. कारण धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा खंडित होण्याची चिन्हे आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील जावयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या परंपरेला जवळपास ८० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह अनेक जिल्ह्यांत यंदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. होळी, धूलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गर्दभ सवारीची ही प्रथाही खंडित होण्याची शक्यता आहे.

काय आहे परंपरा?
साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात १५० घरजावई कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. धूलिवंदनाच्या दोन दिवस आधीपासूनच जावईबापूंना शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकºयांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. त्यांचा तपास करण्यासाठी पथकेही नेमली जातात. धूलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.

नवीन कपड्याचा आहेर
जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर केला जातो. एकदा गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला दुसºयांदा बसवण्यात येत नाही. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशात एकमेव आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना जीन वापरण्याची मुभा, ड्रेस कोडच्या नियमात सुधारणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या