24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home बीड अधिकाऱ्याने केला स्वतःचा अंघोळ करताना फोटो महिला व्हाट्सअप्प ग्रुपवर पोस्ट!

अधिकाऱ्याने केला स्वतःचा अंघोळ करताना फोटो महिला व्हाट्सअप्प ग्रुपवर पोस्ट!

एकमत ऑनलाईन

बीड : बीडकरांना लाजवेल असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बीडच्या एका महिला बालविकास अधिकाऱ्यांने चक्क स्वतः चा न्यूड फोटो व्हाट्सअप्प ग्रुपवर पोस्ट केल्यानं खळबळ माजलीय.जगदीश मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अंगणवाडी शिक्षकांचा ग्रुप आहे. त्या ग्रुप वर एरवी कामकाजाची माहिती शेअर केली जात होतीे. मात्र त्याच ग्रुप वर महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने स्वतः अंघोळ करतानाचा न्यूड फोटो शेअर केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

या आधी देखील या कर्मचाऱ्याकडून असभ्य वर्तन झाल्यानंतर महिलांनी गुन्हा दाखल केला होता.बेशरम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. काम करताना सतत त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

या अगोदर महिलां कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकाऱ्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 चा गुन्हा दाखल आता चक्क आंघोळ करतानाचा फोटो शेअर केल्यानंतर महिला कर्मचाऱ्याकडून निषेध व्यक्त होतोय. आहे.या प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दखल घेतली आहे.

यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या अधिकाऱ्याविरोधात महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी या अधिकाऱ्याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं होतं. आता त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाईल, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

Read More  विवेकानंद रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी ४० खाटा आरक्षित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या