24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeबीडवाळू माफियांच्या पापाच्या घड्यात दोन मुलींचा बळी

वाळू माफियांच्या पापाच्या घड्यात दोन मुलींचा बळी

एकमत ऑनलाईन

माजलगाव : गावाशेजारी असलेल्या गोदावरी पात्राच्या पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या मावस बहिणींचा वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी माजलगाव तालुक्यातल्या महातपुरीत घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून वाळू माफियांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक असे की, महातपुरी येथील काकांकडे भेटण्यासाठी आलेल्या गेवराई तालुक्यातील मणियारवाडी आणि परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील दोन सख्ख्या मावस बहिणी आज सकाळी साडे नऊ वाजता गावाशेजारी असलेल्या गोदावरी पात्रात अंघोळीसाठी गेल्या. त्याठिकाणी वाळू माफियांनी खोदलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही. या खड्ड्यात बुडून एक २० वर्षीय तर दुसरी १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिपाली गंगाधरराव बरबडे आणि स्वाती अरुन चव्हाण असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुंिलचे नावे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या