27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeबीडतुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे -पंकजा मुंडे

तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे -पंकजा मुंडे

एकमत ऑनलाईन

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना घरीच राहण्याचे केले आवाहन

मुंबई : कोरोनाच्या संकटत काळात संपूर्ण देश कोरोनाचा समुळ नाश करण्यासाठी एकवटला आहे. नियम पाळले जात आहेत. संकट टळून जाईल. या निमित्त वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आता बदलली आहे. कारण त्यामुळे कोरोनाच्या फैलावासाठी निमित्त ठरता कामा नये. महाराष्ट्राच्या रणरागिनी, भाजपनेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी २६ जुलै रोजी असणाºया आपल्या वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांना व्हिडिओद्वारे संदेश दिला आहे की त्यांच्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहोचत असून कोरोनाच्या संकट काळात फारसा उत्साह न दाखवता घरीच रहावे, काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये…काळजी करावी…..

काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आपल्या संदेशात…
ताई २६ जुलैला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. शुभेच्छा द्यायला यायचे आहे, असे मॅसेजेस मला येत आहेत. मुळात वाढदिवस साजरे करायला मला आवडत नाही. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कधी कधी ते कराव लागतं. मात्र कोरोनाच्या या संकटाच्या काळात माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण आपल्या शुभेच्छा मनापासून दिल्या आहेतच म्हणून त्या माझ्या पर्यंत पोहोचतील. पण घरा बाहेर पडू नये. काळजी घ्यावी. आपण आरोग्याची काळजी घ्यावी. सर्व नियम पाळावेत हीच माझ्यासाठी खूप मोठ्या शुभेच्छा आहेत. गोपीनाथजी मुंडे नेहमी असे म्हणायचे की, मी जरी तुमच्यापर्यंत पोहचू शकलो नाही तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी कार्यकर्ते माझ्यापर्यंत पोहोचत नसले तरी त्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचत आहे, असेही मा. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

Read More  कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या