सोलापूर — हर्षवर्धन प्रशाला तळे हिप्परगा येथे उत्तर सोलापूर पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी व लंगडी प्रकारात सर्वाधिक सामने जिंकून अजिंक्यपद पटकावले. लहान गट मुले कबड्डी या सामन्यात कारंबा व लंगडी या प्रकारात पडसाळी या संघाचा पराभव केला. लहान गट मुली या सामन्यात कबड्डी व लंगडी प्रकारात बलाढ्य अशा पडसाळी संघाचा एकहाती पराभव केला.मोठ्या गटात मुलांचा संघ कबड्डी या प्रकारात अजिंक्य ठरला.विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास या स्पर्धा प्रकारात आरोही वाघमारे हिचा चित्रकला स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक तर समीक्षा मनाळे हिने निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
क्रीडाशिक्षक राहुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक सामने जिंकून तालुकास्तरीय सर्वसाधारण विजेतेपद मिळविल्याबद्दल केंद्रप्रमुख दिगंबर कटकधोंड,तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तथा विस्तारअधिकारी बापूसाहेब जमादार,गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, ग्रामपंचायत बेलाटी, शाळा व्यवस्थापन समिती बेलाटी, मुख्याध्यापिका प्रिया सुरवसे, मनीषा जंगाले, शीला अडसुळे, रामेश्वर घुगे, विश्वनाथ राठोड यांनी अभिनंदन केले.