14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeराष्ट्रीयबेळगाव-पुणे विमानसेवा बंद

बेळगाव-पुणे विमानसेवा बंद

बेळगाव : बेळगाव-पुणे विमानसेवेला मागणी असूनही ही विमानसेवा अनेक महिन्यांपासून बंद आहे. बेळगावातून विमानाने पुणे प्रवास करणा-यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बेळगावातून सध्या स्टार एअर व इंडिगोची विमानसेवा आहे. यापूर्वी अलाईन्स एअरलाईन्सची बेळगाव-पुणे ही विमानसेवा होती. मात्र, या कंपनीने येथील सर्वच विमानसेवा स्थगित केल्यानंतर येथील विमानसेवा बंद झाली. पुणे विमानतळावरून परवानगी व वेळापत्रकाचे नियोजन करताना अडचणी येत असल्यामुळे ही विमानसेवा बंद आहे.

बेळगाव-पुणे दरम्यान प्रवास करणा-यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे बेळगाव-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील ११ शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, मुंबई, तिरुपती, सुरत, बंगळूर, हैद्राबाद, नागपूर, जयपूर व दिल्ली या ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. इंडिगो व स्टार एअर कंपन्यांमार्फत विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR