23.5 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeपरभणीपरभणीत भारतीय मजदूर संघाची बैठक उत्साहात

परभणीत भारतीय मजदूर संघाची बैठक उत्साहात

परभणी : भारतीय मजदुर संघाला ७० वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने भारतीय मजदूर संघाचा राज्यभर दौरा सुरू आहे. या दौ-यात परभणी हेड पोस्ट ऑफिसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय संघाची वाटचाल आणि पुढील आव्हाने या विषयावर चर्चा करण्यात आली.

या दौ-या दरम्यान भारतीय मजदूर संघाचे पूर्ण कालीन सभासद् व प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ तसेच पूर्ण कालिंका सभासद व वीज कर्मचारी संघाचे प्रदेश प्रमुख उमेश विश्ववद तथा संजय सुरवसे, बांधकाम कामगार प्रदेश प्रमुख हेही या प्रवास दरम्यान दि. ५ रोजी परभणी येथे भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी या बैठकी दरम्यान पुढील काळामध्ये सभासद संख्या कशी वाढवावी, न्यू संघटित, असंघटित क्षेत्रामध्ये संघटना कशी वाढीस न्यावी या संदर्भात फार मोलाचे मार्गदर्शन केले.

या सभेचे आयोजन परभणी हेड पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष मंगेश सोनवणे, सचिव प्रसाद डाफणे, विशाल पिंगळीकर, गणेश उपाध्ये, अर्जुन लांडगे, नितीन मुळे इत्यादींच्या सहकार्याने यशस्वी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR