मुंबई : ‘दम लगा के हईशा’ पासूनच भूमी पेडणेकरने अनेक चांगल्या भूमिका, चित्रपट केले आहेत. आता तिने आगामी ‘भक्षक’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येईल. निर्मात्यांनी २ वर्षांपूर्वी २०२२ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे आणि ती महिलांवर होणा-या गुन्ह्यांच्या वास्तवाशीदेखील संबंधित आहे.
शाहरूख खानने बिहारमधील वास्तविक घटनांवर आधारित ‘भक्षक’ हा गंभीर थ्रिलर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाचे शूंिटग कोविडच्या काळात सुरू झाले होते आणि त्याचे शूंिटग २०२२ मध्येच पूर्ण झाले होते. आता हा चित्रपट रिलीज होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
‘भक्षक’मध्ये भूमीशिवाय अभिनेता संजय मिश्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २ तास १६ मिनिटे ४७ सेकंदांचा आहे. हा चित्रपट मार्च किंवा एप्रिलमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. पुलकितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वृत्तानुसार, ‘भक्षक’ हा बिहारच्या वादग्रस्त मुझफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणावर आधारित क्राईम थ्रिलर चित्रपट असेल.