34.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमुख्य बातम्याबिल्किस बानो प्रकरण : आत्मसमर्पणासाठी आणखी मुदत मागणा-यांना दणका!

बिल्किस बानो प्रकरण : आत्मसमर्पणासाठी आणखी मुदत मागणा-यांना दणका!

नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ पैकी नऊ दोषींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. या याचिकांवर आज (शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील सर्व ११ दोषींचे अर्ज फेटाळून लावले. सर्व दोषींना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

गुजरात सरकारने या ११ दोषींना माफीच्या आधारावर मुदतपूर्व सुटका करून तुरुंगातून सोडले होते. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर ८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने या दोषींना दोन आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोषींनी आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ मागितला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR