24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
Homeराष्ट्रीयबिश्नोई गँग फुटली

बिश्नोई गँग फुटली

गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले

चंदिगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या घरावर फायरिंग करणा-या कुप्रसिद्ध लॉरेंस गँगचे दोन तुकडे पडले आहेत. लॉरेंस गँगपासून गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा वेगळे झाल्याचे वृत्त आहे. लॉरेंस तुरुंगात गेल्यावर हे दोघेच परदेशातून गँग सांभाळत होते.

लॉरेंस गँग आणि पंजाब पोलिसांमधील सुत्रांनुसार साबरमती तुरुंगात कैदेत असलेला लॉरेंस आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि गोदारा यांचा दुसरा गट तयार झाला होता. अद्याप या दोन्ही बाजूंकडून काही माहिती आलेली नाही. परंतू, सुत्रांनुसार लॉरेंन्स आणि गोल्डी यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. ब्रार आपल्यासोबत गोदाराला घेऊन बाजुला झाला आहे.

लॉरेंसच्या सूचनेवरून हे दोघे कॅनडातून टोळी चालवत होते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्रासह इतर राज्यांत दहशत पसरवत आहेत. मोठमोठ्या व्यक्तींची हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी असे गुन्हे करत आहेत. एवढेच नाही तर ब्रार आणि गोदारा यांनी मिळून कॅनडा, अमेरिका, यूके, युरोपमध्ये लॉरेन्सच्या टोळीविरोधी गुंडांचे टार्गेट किलिंग केले आहे. अद्याप या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात काही केलेले नसले तरी ब्रार आणि गोदारा यांनी लॉरेन्स शिवाय कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

लॉरेन्स भारतात स्वत:ला हिंदू गुंड म्हणून दाखवतो. तर गोल्डी ब्रारचे खलिस्तानी दहशतवाद्यांशीही संबंध आहेत. यामुळे या दोघांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असल्याने त्यांच्यात फूट पडल्याचे सांगितले जात आहे. पंजाब पोलिसांच्या तपासातही अनेकदा गोल्डी ब्रार खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे असे पंजाब पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR