मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले आहेत. यात बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघांनाही एकत्रित पक्षाचे काम करावे लागणार आहे.
भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणुका प्रभारींची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. यात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. लातूर शहरमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर, ग्रामीणमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांची जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे प्रभारीपद दिले.
धाराशिवमध्ये सुजितसिंह ठाकूर निवडणूक प्रमुख आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केली. परभणीत शहरप्रमुखपदी सुरेश वरपूडकर तर ग्रामीणच्या प्रमुखपदी रामप्रसाद बोर्डीकर प्रभारी म्हणून मेघना बोर्डीकर यांची तर हिंगोली निवडणूकप्रमुखपदी तानाजी मुटकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

