20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeराष्ट्रीयभाजपला देशात गुंडा राज आणायचा

भाजपला देशात गुंडा राज आणायचा

बाबा सिद्दीकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले

नवी दिल्ली : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दस-याच्या दिवशी रात्री ९.३० च्या सूमारास बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि हरयाणीतील तिघांनी सिद्दिकी यांच्यावर हा गोळीबार केला. दरम्यान, या घटनेवरुन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील लोक भयभीत झाले आहेत. त्यांनी दिल्लीतही कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण निर्माण केले आहे. या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचा आहे. आता जनतेला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागे अशी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.

गुंड इतके सक्रिय का झाले?
दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनीदेखील या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, मुंबईत भाजपचे सरकार आहे आणि त्यांच्याच नेत्याची हत्या होते. याहून तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहू शकता. दिल्लीतही कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. इथेही मुंबईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही खूप गंभीर बाबत आहे अशी प्रतिक्रिया सौरभ यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR