19.4 C
Latur
Tuesday, December 16, 2025
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात होणा-या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचे ४० स्टार प्रचारक राजकीय रणधुमाळी करणार आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे आदी नेत्यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होउ घातल्या आहेत. त्याच्या प्रचाराचा राजकीय धुरळा आता उडायला सुरूवात झाली आहे. भाजपने त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आधी स्टार प्रचारकांच्या संख्येवर निर्बंध होते. केवळ २० स्टार प्रचारकांनाच मुभा होती. मात्र राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने ही संख्या दुप्पट करून ४० केली आहे. त्यामुळे भाजपाचे ४० स्टार प्रचारक राज्यभरात प्रचाराची आघाडी सांभाळणार आहेत. अशोक चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह युवा फायरब्रॅन्ड मंत्री नितेश राणे यांचाही या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR