23.4 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदारू सोडताच सात महिन्यांत मेंदूच्या पेशींत सुधारणा

दारू सोडताच सात महिन्यांत मेंदूच्या पेशींत सुधारणा

वॉशिंग्टन : दारूचे व्यसन असलेल्या आणि संबंधित आजारांशी झगडत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून जर एखाद्या व्यक्तीने ७.३ महिने दारू पिणे सोडले तर मेंदूच्या खराब झालेल्या पेशी सुधारू लागतात. अमेरीकेत एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांना अल्कोहोल यूज डिसऑर्डरचा सामना करावा लागतो.

जास्त मद्यपान केल्याने मेंदूच्या कॉर्टेक्सचा बाहेरील थर पातळ होतो. या थरावर सुरकुत्या दिसतात. त्यामुळे लोकांची निर्णय घेण्याची शक्ती कमी होते. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीने ७.३ महिने सतत दारू पिणे बंद केले तर त्याच्या मेंदूच्या कॉर्टेक्सचा बा स्तर बरा होऊ लागतो. त्याचे परिणाम पहिल्या महिन्यापासूनच दिसू लागतात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ टिमोथी दुराझो यांनी सांगितले की, दारू सोडल्यानंतर पहिल्या महिन्यात मेंदूच्या कॉर्टेक्सची जाडी हळूहळू बरी होऊ लागते. यानंतर, पुढील सहा महिन्यांत ती हळूहळू पूर्णपणे सुधारते. अमेरिकेतील सुमारे १.६० कोटी लोक अल्कोहोल यूज डिसऑर्डर (एयूडी)मुळे त्रस्त आहेत. हा तेथील मुख्य आरोग्याचा प्रश्न बनला आहे.

मद्यपानामुळे मेंदूची रचना बदलते
मद्यपान केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो. अनेक लोकांना दारूचे व्यसन सोडायचे असूनही सूटत नसते. मेंदूचा प्री-फ्रंटल कॉर्टेक्स नियोजन आणि निर्णय घेण्यात गुंतलेला असतो. परंतु हा भाग अवऊ ग्रस्त लोकांसाठी कमी कार्य करतो. असे लोक कोणताही योग्य निर्णय घेऊ शतत नाहीत. ही माहिती नुकतीच अल्कोहोल जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.

८८ एयूडी रुग्णांचा अभ्यास
टिमोथी दुराझो आणि त्यांच्या सहका-यांनी ८८ एयूडी रुग्णांचा अभ्यास केला. या लोकांना दारू सोडायची होती. त्यांना दारू सोडण्यासाठी मदत करण्यात आली. दारू सोडल्यानंतर पहिला आठवडा, पहिला महिना आणि ७.३ महिन्यानंतर त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले. २३ जणांचे पहिल्या आठवड्यात स्कॅनिंग झाले नाही. त्यांचे एक महिन्यानंतर स्कॅनिंग करण्यात आले. परंतु ८८ लोकांपैकी केवळ ४० लोक असे होते जे ७.३ महिन्यांसाठी दारू सोडू शकले. म्हणजे संपूर्ण अभ्यास कालावधीत त्यांनी दारू पिली नाही.

म्हणून..एयूडीची समस्या
टिमोथी यांच्या टीमने अशा ४५ लोकांचाही अभ्यास केला जे एयूडीग्रस्त नव्हते. ९ महिन्यांनंतर त्यांचा मेंदूचे स्कॅनिंग करून कॉर्टेक्सची जाडी तपासण्यात आली. कॉर्टेक्सच्या ३४ भागाच्या जाडीची तपासणी करण्यात आली. एयूडीग्रस्त लोकांमध्ये ३४ पैकी २४ ठिकाणी जाडी कमी होती. तर अवऊ ग्रस्त नसलेल्यांमध्ये ही समस्या कमी आढळून आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR