23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeराष्ट्रीयदेशात स्तन कर्करोग मृत्यू प्रकरणे १३ टक्क्यांनी वाढली

देशात स्तन कर्करोग मृत्यू प्रकरणे १३ टक्क्यांनी वाढली

राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती रुग्णांचा आकडा सुमारे अडीच लाख

नवी दिल्ली : देशातील महिलांच्या आरोग्यावर कर्करोगाचे संकट अधिक गडद होत आहे. राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, २०२१ ते २०२५ या कालावधीत स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये आणि त्यामुळे होणा-या मृत्यूंमध्ये सुमारे १३% ची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

२०२५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन अंदाजित प्रकरणांचा आकडा २.४० लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे, जी आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर, गर्भाशयाच्या कर्करोग (ओव्हेरियन कॅन्सर) सर्वात धोकादायक ठरत आहे. यामुळे मृत्यू दर सुमारे ६१% आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात (सर्वाइकल कॅन्सर) मृत्यू दर ५४ टक्के आणि स्तनाच्या कर्करोगात ४३ टक्के आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बंगाल आणि राजस्थानमध्ये कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे आहेत. तर, बिहार आणि छत्तीसगडमध्ये कर्करोगाचा आलेख सर्वात वेगाने वाढला आहे. येथे नवीन प्रकरणांमध्ये सुमारे २१-२२% आणि मृत्यूंमध्ये सुमारे २०% वाढ नोंदवली गेली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, सरकार ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या अनिवार्य तपासणीवर (स्क्रीनिंग) भर देत आहे, जेणेकरून रोगाचे लवकर निदान होऊ शकेल.

जीवनशैली, आहार-विहार कारणीभूत
भारतात महिलांमध्ये सर्वात जास्त होणारा कॅन्सर म्हणजे स्तन (ब्रेस्ट), गर्भाशय ग्रीवा (सर्व्हायकल) आणि अंडाशयाचा (ओवेरियन) कॅन्सर. स्तन आणि गर्भाशय ग्रीवा कॅन्सर महिला रुग्णांच्या ४० टक्के प्रकरणात आढळतो. गर्भाशय ग्रीवा कॅन्सर प्रामुख्याने ुमन पॅपिलोमाव्हायरससारख्या (एचपीव्ही) संसर्गामुळे होत असला तरी स्तन आणि अंडाशयाचा कॅन्सर अनेकदा हॉर्मोनल बदलांमुळे होतो. या हॉर्मोनल कॅन्सरच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीतील बदलही महत्वाचे आहेत. ज्यात उशिराची गर्भधारणा, कमी स्तनपान, जास्त वजन किंवा लठ्ठपणा आणि बसून राहण्याची सवय (बैठी सवय) यांचा समावेश आहे.

ईशान्य भारत कॅन्सरच्या केंद्रस्थानी
ईशान्य राज्यांतील बहुतांश कॅन्सरसाठी जीवनशैलीच महत्वाचा घटक आहे, याबद्दल मला खात्री आहे. इथे तंबाखूचा वापर खूप जास्त आहे आणि तो इतर भागांपेक्षा खूप जास्त आहे असे आसाममधील कचर कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख आर. रवी कन्नन यांनी सांगितले. आसाममधील बराक व्हॅलीमध्ये तंबाखू मोठ्याप्रमाणात चघळली जाते, तर तिथून अवघ्या २५ किमी दूर मिझोराममध्ये सिगारेट पिण्याची म्हणजेच धुम्रपानाची सवय जास्त आहे. त्यात दारू, सुपारी आणि मांस कसे तयार केले जाते हेही येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR