नवी दिल्ली : २०२४-२५ या वर्षासाठीचा पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या एप्रिल-मेमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर सादर करेल. दरम्यान, १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर विद्यमान मोदी सरकारतर्फे मांडण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला मांडतील. अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल अपेक्षित नाहीत. आर्थिक सर्वेक्षण अहवाल ३१ जानेवारी रोजी सादर केले जाईल.
अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्पादरम्यान देशासाठी गेल्या एक वर्षाचा आर्थिक लेखाजोखा कसा होता आणि येत्या आर्थिक वर्षात कोणत्या कामांसाठी किती पैसा लागेल याची माहिती देतील.
अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ३१जानेवारीला देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाशी संलग्न मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांच्या टीमने तयार केलेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल ३१ जानेवारी रोजी सादर केले जाईल.