23.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रबुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन

बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन

स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : राधेश्याम चांडक

बुलडाणा : विशेष प्रतिनिधी
सुलभ पतपुरवठ्याच्या माध्यमातून अर्थ उन्नती साधण्यासाठी हातभार लावणारे व समाजामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाची पेरणी करण्याचं काम राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या नेतृत्वात बुलडाणा अर्बन अविरत करत आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन बुलढाणा – अजिंठा मार्गावर करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

रन फॉर फॉरेस्ट असे ब्रीद असलेले ही स्पर्धा १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता गजानन महाराज संस्थान अंतर्गत,स्वयंप्रकाश संस्थान, गिरडा ता .जि. बुलडाणा येथुन सुरुवात होणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून स्पर्धेची सविस्तर माहिती त्यावर देण्यात आलेली आहे. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी या तीन प्रकारात ही स्पर्धा होईल. या १० आणि २१ किलोमीटर साठी वेळ मर्यादेचे बंधन आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी ही २४ फेब्रुवारी २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर सदर रजिस्ट्रेशन ऑफलाईनसाठी रविंद्र पाटील ९८३४३६६७१५, सचिन गाढवे ९९७०६२६०४१ यांच्याकडे स्विकारले जाणार आहे.

दरवर्षी या स्पर्धेला महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. याही वर्षी असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेशाम चांडक यांनी व्यक्त केला आहे. सदर स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड, बुलडाणा येथे दि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सर्व सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेसाठी अधिकृत टी-शर्ट, गुडी बॅग टी-शर्ट ,बीब नंबर मिळणार आहे, तर स्पर्धेसाठी फिनिशर साठी फिनिशर मेडल, ब्रेकफास्ट आणि सोबतच या मार्गावर वैद्यकीय मदत आणि अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निसर्गाशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR