एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक येथील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय देणा-या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून निदा खान पोलिसांना चकवा देत फिरत होती. अखेर तिला पोलिसांनी गुप्त पद्धतीने छापा टाकत अटक केली. ती ज्या घरात राहत होती ते घर मतीन पटेल यांचं असल्याचं नंतर उघडकीस आलं. तसेच ते अनधिकृत असल्याचं देखील महानगरपालिकेने म्हटलं आहे. दरम्यान या घटनेने निदा खानचे राजकीय कनेक्शन असल्याचे समोर आले असून या प्रकरणात आणखी किती मासे गळाला लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर सुरू होते. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान काही दिवसांपासून फरार होती. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून तिला अटक केली. तपासादरम्यान ती ज्या घरात लपून बसली होती, ते घर नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले.

या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी मतीन पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास अधिक तीव्र केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिकेनेही त्यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात पटेल यांच्या मालकीची दोन घरे आणि एक कार्यालय अशा तीन मालमत्तांचे बांधकाम विनापरवानगी आणि नियमबा असल्याचे आढळून आले.

महापालिकेने तीन दिवसांपूर्वी नोटीस बजावत संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत आवश्यक परवानग्या किंवा कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने आज सकाळी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.
या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि कायदेशीर कारवाई कितपत पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news