22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeउद्योगजगत‘एचसीएल’ ठरली भारतातील तिसरी मोठी ‘आयटी’ कंपनी

‘एचसीएल’ ठरली भारतातील तिसरी मोठी ‘आयटी’ कंपनी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उद्योगक्षेत्रात जलद गतीने भरारी घेत ‘एचसीएल’ भारतातील तिसरी सर्वात मोठी ‘आयटी’ कंपनी बनली आहे. ‘एचसीएल’चा मागल्या चार वर्षाचा रिव्हेन्यू बघता शिव नादर यांची ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’ गेल्या चार वर्षांपासून कमाईच्या बाबतीत भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

विप्रोचा रिव्हेन्यू २.२ लाख कोटी असून विप्रोच्या तुलनेत एचसीएल टेकने २.५ लाख कोटी रिवेन्यू जनरेट करत विप्रोला मागे टाकले आहे. असे असले तरी शेअर्सचा विचार करता एचसीएल कंपनीचे शेअर्स घसरले असून सगळ्याच आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

विप्रो ही एचसीएलच्या तुलनेत जुनी कंपनी असून ०.३ लाख कोटींच्या तुलनेत एचसीएलने विप्रोला मागे टाकले आहे. विप्रो कंपनी १९४५ मध्ये उदयास आली होती. एचसीएल कंपनी १९९१ साली उदयास आली.

मार्केटमध्ये एचसीएलचे शेअर्स घसरले असून अनेक आयटी कंपन्यांची स्थिती सारखीच आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र सगळ्या कंपन्यांच्या तुलनेत जास्त घसरण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या