24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतभारतीय अर्थव्यवस्थेची धूम, पहिल्या तिमाहीत जीडीपी १३.५ टक्क्यांवर

भारतीय अर्थव्यवस्थेची धूम, पहिल्या तिमाहीत जीडीपी १३.५ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या दोन वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था १३.५ टक्क्याने वाढली आहे, तर २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी २०.१ टक्के होता.

यापूर्वी जीडीपीमध्ये सर्वोच्च वार्षिक वाढ एप्रिल-जून २०२१ मध्ये नोंदवली गेली होती. जेव्हा ती एका वर्षापूर्वी महामारीच्या पातळीपेक्षा २०.१ टक्क्यांनी जास्त होती.

तुलनात्मक आधाराचा विचार करता अनेक विश्लेषकांनी देशाचा आर्थिक विकास दर दुहेरी अंकात राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. रेटिंग एजन्सी कउफअ ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर १३ टक्के असेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार हा दर १५.७ टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता. तर, या महिन्यातील पतधोरण आढाव्यात आरबीआयने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सुमारे १६.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. २०२२ च्या एप्रिल-जून तिमाहीत चीनचा विकास दर ०.४ टक्के राहिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या