26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home उद्योगजगत २०२५ पर्यंत ५,००० अब्ज डॉलर्सची

२०२५ पर्यंत ५,००० अब्ज डॉलर्सची

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सन २०२५ पर्यंत ५,००० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आपली संपूर्ण इकोसिस्टम मजबूत करीत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ही माहिती दिली.

प्रवासी भारतीय दिवस परिषदेत गोयल म्हणाले की, ५,००० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आम्ही लवकरच जलद स्ट्रक्चरल सुधारणांद्वारे हे साध्य करू. गोयल म्हणाले, आम्ही आमची गुणवत्ता, उत्पादकता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहोत. याद्वारे भारतीय उद्योग आपल्या निर्यातीचा विस्तार करू शकेल. ते खरोखरच मोठे, अधिक चांगले आणि व्यापक होईल. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचा प्रवेश वाढविण्यासाठी नव्या बाजारपेठेत आक्रमकपणे शक्यतांचा शोध घेण्यात येत असल्याचे मंत्री म्हणाले.

बाजारपेठेबद्दल भारतीयांना अधिक माहिती
परदेशात राहणा-या भारतीयांना ग्राहक बाजाराविषयी अधिक माहिती आहे. आपणास ग्राहकांचे व्यवहार गंभीरपणे समजले पाहिजे तसेच, परदेशी बाजाराच्या अनुषंगाने भारतीय उद्योगांना उत्पादने विकसित करण्यास मदत करू शकेल, गोयल म्हणाले़

ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या