पुणे : तरुणांनी स्थापन केलेली एनजीओ, सामाजिक उपक्रम आणि स्टार्टअपला बूस्टर मिळावा म्हणून त्यांना नेटवर्किंग, फंडिंग यासह विविध बाबींचे मार्गदर्शन आणि सल्लागार उपलब्ध करून देत एक वर्ष इनक्युबेशन पुरविणा-या ‘अशोका यंग चेंजमेकर्स’मध्ये राज्यातील ३ स्टार्टअपची निवड झाली आहे.
अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक’ हे सामाजिक उद्योजक आणि चेंजमेकर्सचे जगातील एक मोठे नेटवर्क आहे. त्यात ‘अशोका यंग चेंजमेकर्स’च्या तिस-या आवृत्तीत देशातील एकूण १३ चेंजमेकर्स म्हणजे तरुणांचे विविध उपक्रम निवडले गेले आहेत.
निवडण्यात आलेले उपक्रम हे मानसिक आरोग्य, आर्थिक साक्षरता, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, दळणवळण, आरोग्यसेवा कला आणि संस्कृती यामधील विविध समस्यांना हाताळत त्यातून समस्या दूर करीत आहेत. संगम इंडिया (पुणे), इम्पॉवर (मुंबई) आणि फन लर्निंग यूथ (जळगाव) अशी महाराष्ट्रातून निवड झालेल्या ३ उपक्रमांची नावे आहेत.